मोबाइल फोन ही काळाची गरज बनलेली असतानाच, अनेक ज्येष्ठ नागरिक, गृहिणी नवनव्या स्मार्टफोनचा वापर करताना गोंधळतात. म्हणूनच मोबाइलचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण देणारी एक दिवसाची स्मार्टफोन प्रशिक्षण कार्यशाळा मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या कार्यशाळेचा मीडिया पार्टनर आहे.
‘संवेदन’ या प्रशिक्षण संस्थेच्या समीर दिघे यांनी ही प्रशिक्षणपद्धती तयार केली आहे. मोबाइल फोन हातात कसा धरावा? इथपासून ते तुमच्या स्मार्टफोनमध्ये एखादं अॅप्लिकेशन कसं डाऊनलोड करावं, फेसबुक-व्हॉटसअॅपचा वापर, टॅक्सी बुक करणं, वेगवेगळ्या बिलांची रक्कम अदा करणं या गोष्टी कशा कराव्यात याचा सराव या कार्यशाळेत करून घेण्यात येईल.
संपूर्ण दिवसाच्या कार्यशाळेत दुपारचं जेवण, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मोबाइल वापराबाबत सचित्र माहिती देणारी पुस्तिकाही देण्यात येईल. तसंच एक विशेष पेनही सर्वांना देण्यात येईल, ज्याद्वारे मोबाइलवरील टचचा वापर अधिक सोप्या पद्धतीनं करता येईल.
कार्यशाळेची फी १५०० रुपये असून, त्यात ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’चं वार्षिक सभासदत्व मोफत दिलं जाईल. ‘कल्चर क्लब’च्या सदस्यांसाठी ही फी १२०० रुपये असेल. संपर्क - ७७१५९०१२९८/ ७७१५८३०५७४
कधी? मंगळवार, १२ नोव्हेंबर
कुठे? महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (प)
वेळ? सकाळी १० ते सायंकाळी ५
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट