मुंबईतल्या अनेक भागांमध्ये सकाळी गारठा जाणवू लागलाय. थंडीच्या आल्हाददायी वातावरणात सकाळी अंथरुणातून बाहेरही पडावंसं वाटत नाही. बाहेर पडलोच तर वाफाळत्या चहाचा किंवा कॉफीचा आस्वाद घेतल्याशिवाय दिवस सुरु होत नाही. या दिवसांत पहिल्या लेक्चरला न जाण्याचे बहाणे शोधणं, कॉलेजला जाऊन कॅम्पसमध्येच कटिंग चहा पीत मारलेल्या गप्पा किंवा सहल-ट्रेकचं प्लॅनिंग सुरु असतं. हुडहूडी भरवणाऱ्या या दिवसांत कित्येक जण घरीच राहणं पसंत करतात तर कित्येक जण आवडत्या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देतात. अशा गुलाबी थंडीच्या तुमच्या काय आठवणी आहेत? थंडी एन्जॉय करण्याचा तुमचा फंडा काय आहे? कॅम्पसमध्ये कसं वातावरण पाहायला मिळतंय? तुम्ही या आल्हाददायी वातावरणात कुठे फिरायला जाणार असाल किंवा एखादी सुट्टी मिळालीच तर काही हट के प्लॅन ठरवत असाल तर त्याविषयी नक्की सांगा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट