अतिरेक नको सोशल मीडिया आणि कट्ट्यावर झालेल्या मैत्रीमध्ये जमीन आणि आसमान इतका फरक आहे असं म्हणावं लागेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज, त्यावरच्या गप्पा गोष्टी या फक्त काही क्षणापुरत्याच असतात. पण कट्ट्यावर झालेली मैत्री कदाचित आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट बनून जातो. ही कट्ट्यावरची मैत्री विश्वासानं जपली जाते. सोशल मीडियावरील मैत्रीत हे नाही. तरुणाईला लागलेलं हे एक व्यसन आहे असं म्हणता येईल. सोशल मीडियावरील मित्र हे फक्त गप्पा-गोष्टींसाठीच बनलेले असतात. पण, जे कट्ट्यावर बनलेले मित्र असतात ते आपल्याला गरजेच्या वेळी धावून येतात. सोशल मीडियावरील मैत्री टाळता येणार नाही. पण, त्याचा अतिरेक नको. नरेश कौटे, जीवनदीप कॉलेज 0000 लाइक्स-कमेंट्सपुरतीच सोशल मीडिया म्हणजे व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर असे ऑनलाइन कट्टे जिथे कोणीही कधीही आपले विचार मांडू शकतो. इथे अनोळखी व्यक्तीसोबत आपण मैत्री करू शकतो. पण हे असे ऑनलाइन मित्र खरेच मित्र होऊ शकतात का? खऱ्या आयुष्यात ते भेटतात का? बहुधा नाहीच. मी स्टेटस ठेवलं आणि ते अमुक इतक्या लोकांनी पाहिलं,मला इतके लाईक मिळाले, एवढ्या कमेंट्स आल्या म्हणजे ते माझे मित्र असं होत नाही. Bff किंवा bestie हे फक्त फेसबुकसारख्या सोशल मीडियापुरतेच असतात. खऱ्या आयुष्यात असे खूप कमीच असतात. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अमुक साईटवर मित्र आहोत असं म्हटलं जातं. पण, त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष किती वेळा भेटतो? तर जवळपास नाहीच. सोशल मीडियावरची ही मैत्री खरी असणं निव्वळ अशक्य. कारण त्यावर होणारे मेसेज आणि त्यांचे रिप्लाय हेच अनेकदा खोटे असतात. मैत्री ही कधीच सोशल मीडिया साईटवर व्हर्च्युअल बनत नसते तर ती खऱ्या आयुष्यातच होते. ती मैत्रीच आपण अनुभवायला हवी. मयुरेश जोशी, जोशी-बेडेकर कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट