Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 189

पाऊस, कॉलेज आणि आठवणी!

$
0
0

पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता हळूहळू सहलींबाबत चर्चाही सुरू होतील. कुठे, कसं, कधी जायचं याविषयीच्या रोजच्या शेकडो मेसेजेसनी चॅट्स तुडुंब भरतीलही. पण या सगळ्या मूडमध्ये कॉलेजला विसरला नाहीत ना? मुसळधार पाऊस पडल्यानंतर थंडगार झालेल्या वातावरणात सकाळी उठायचा कंटाळा येणारच! कॉलेजमध्ये लेक्चरला बसलात की, खिडकीबाहेर दिसणाऱ्या सरी बघत राहाव्याशा वाटत असतील; नाही का? एखाद्या लेक्चरला दांडी मारून कट्ट्यावर बसून चहाचे भुरकेही मारावेसे वाटत असतील. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या कॅम्पसमध्ये पावसाची गाणी गुणगुणत तासनतास बसावंसं वाटत असेल. तर काहींना कॉलेजच्या एका कोपऱ्यात बसून एखादं छानसं पुस्तक वाचत बसावंसं वाटत असेल. हे सगळं तुम्ही याआधी केलंही असेल. नेमकं हेच तुम्हाला मांडायचं आहे युवा कट्टाच्या व्यासपीठावर. पाऊस आणि कॉलेज या खास नात्याविषयी आणि भन्नाट आठवणी मुंटासोबत शेअर करा आणि तुमच्या आठवणींना उजळा द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 189

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>